Padmavati controversy | अखेर पद्मावतीचे ग्रहण सुटले | प्रदर्शनाची तारीख ठरली | Lokmat Marathi News

2021-09-13 18

अनेक अडथळे पार करत अखेर पद्मावती हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगु या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. सेन्सॉर बोर्डाने पाच बदलांसह सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना हा सिनेमा पाहता येणार नाही.काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, निर्मात्यांना सिनेमाचे नाव बदलण्यास सांगण्यात आले होते. यानंतरच निर्मात्यांनी ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ केले. फेसबुकवरही या सिनेमाचे नाव बदलून पद्मावत केले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires